ठाकरे गटाचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल म्हणाले...

ठाकरे गटाचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल म्हणाले...

ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, उद्योगपती रामदेव बाबा व भाजपाच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते आहे ती पोकळ तर आहेच, परंतु भंपकदेखील आहे. कारण त्यात राजकीय स्वार्थ व पेटवापेटवीशिवाय दुसरे काही नाही. ‘द्रविडी’ पक्ष सनातन धर्म मानत नाहीत हा त्यांचा राजकीय विचार आहे. तिरुनेलवेली येथे पापनासम मंदिर आहे. एखाद्याची पापे धुऊन काढायची तर येथे जायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना याच पापनासम मंदिरात जावे लागेल व त्या विधीचे पौरोहित्य उद्योगपती बाबा रामदेव यांना करावे लागेल.प्रख्यात उद्योगपती, योगाचार्य बाबा रामदेव यांनी सांगितले की, जे सनातनला शिव्या देत आहेत, त्यांना २०२४ साली मोक्ष मिळेल. उद्योगपती रामदेव यांनी हे मोक्षपुराण काशी येथे सांगितले. काशी हे महातीर्थ आहे. विद्या आणि मोक्षाची नगरी आहे. काशी ही सत्यनगरीसुद्धा आहे. त्यामुळे बाबा सत्य बोलले असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा नगरीत येऊन उद्योगपती रामदेव यांनी ‘मोक्ष’ देण्याच्या नव्या उद्योगाची घोषणा केली.

तसेच हृदयविकारावर रामबाण औषध रामदेव बाबांनी शोधले, पण बाबांच्याच पतंजलीचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांना हृदयविकाराचा झटका येताच प्राण वाचविण्यासाठी त्यांना दिल्लीतील इस्पितळात दाखल करावे लागले. आता रामदेव बाबांनी ‘मोक्ष’प्राप्तीकडे मोर्चा वळवला. या मोक्ष उद्योगाचे ‘पेटंट’ पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिले असेल तर २०२४ साली हा ‘मोक्ष’ उद्योग साफ कोसळून पडणार आहे. उद्योगपती रामदेव बाबा व भाजपाच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते आहे ती पोकळ तर आहेच, परंतु भंपकदेखील आहे. कारण त्यात राजकीय स्वार्थ व पेटवापेटवीशिवाय दुसरे काही नाही. ‘द्रविडी’ पक्ष सनातन धर्म मानत नाहीत हा त्यांचा राजकीय विचार आहे. तिरुनेलवेली येथे पापनासम मंदिर आहे. एखाद्याची पापे धुऊन काढायची तर येथे जायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना याच पापनासम मंदिरात जावे लागेल. असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com