राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात समरजितराजे घाटगे यशस्वी; कागलच्या नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात समरजितराजे घाटगे यशस्वी; कागलच्या नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

कागलच्या विद्यमान नगराध्यक्षा माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी हे पती पत्नी कार्यकर्त्यांसह राजे गटात दाखल

सतेज औंधकर | कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंग घाटगे यांनी त्यांचे भाजपमध्ये कोल्हापुरातील नागाळापाकातील निवासस्थानी स्वागत केले.

माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे. याआधी मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, संतोष सोनुले यांनीही प्रवेश केला आहे. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचे होमग्राउंड आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com