Sanjay Raut | Raj Thackeray
Sanjay Raut | Raj ThackerayTeam Lokshahi

'राऊतांनी सुरक्षा काढून यावं, शिवसेना भवनाच्या पटांगणात XXXवर फटके देऊ'

मनसे नेत्यांची संजय राऊतांवर आगपखड

मुंबई : विधीमंडळाला हे चोरमंडळ असल्याचे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ केला होतो. हा विधीमंडळाचा अपमान ठरवत राऊतांना हक्कभंगची नोटीस पाठवण्यात आली आहे. याचवर मनसे नेते संदीप देशपांडेअमेय खोपकर यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.

Sanjay Raut | Raj Thackeray
हल्ल्यामागचा क्रिकेटर नाही तर कोच पण बाहेर येईल; संदीप देशपाडेंचा सूचक इशारा

संजय राऊत यांचा मेंटल बॅलन्स गेलं आहे. मी पत्र लिहून पण काळजी व्यक्त केली आहे. सतत कोणीतरी हल्ला करेल असं त्यांना वाटतं. मग याला शिव्या घाल आणि त्याला शिव्या घाल हे सुरु असतं. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर मग ते त्यांना पण शिव्या घालतात, असा निशाणा संदीप देशपांडेंनी राऊतांवर साधला आहे.

तर, संजय राऊत जर यांचं जर असं वक्तव्य असेल तर मग त्यांनी त्यांची सुरक्षा काढावी आणि आमच्या समोर यावं. त्यांना शिवसेना भवनाच्या पटांगणात ढुंगणावर फटके देऊ, अशा शब्दात अमेय खोपकर यांनी संजय राऊतांच्या विधानावर टीका केली आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी चोरमंडळ या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. मी विधिमंडळला असं बोलायला वेडा नाही, माझा वक्तव्य फक्त एका व्यक्ती पुरते होते. मला आलेली नोटीस मी वाचली नाही. मी दौऱ्यावर आहे. नोटीस वाचून ठरवेन काय करायचे ते. शिंदे गटाच्या मागणीने अटक होणार असेल तर होऊदे, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com