Uddhav Thackeray | Raj Thackeray
Uddhav Thackeray | Raj ThackerayTeam Lokshahi

तुम्ही आता पंतप्रधान होणार, मज्जा आहे बाबा एका माणसाची; मनसेने उडवली ठाकरे गटाची खिल्ली

संजय राऊतांच्या पंतप्रधान पदाच्या विधानाबाबत मनसेची खोचक टीका

मुंबई : 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची, अशी टीका त्यांनी केली आहे.

Uddhav Thackeray | Raj Thackeray
वादळामध्ये पत्र्याची घर झाली जमीनदोस्त; कुटुंब मुलाबाळांसह तहसील कार्यालयात

काय म्हणाले संदीप देशपांडे?

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा "पण बुरा ना मानो होली है "आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे हल्ला झाला होती. देशपांडे मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. यात ते जखमी झाले होते. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद केवळ क्रिकेटर नाही तर कोच पण बाहेर येतील. जेव्हा आरोपी पकडला जाईल तेव्हा मी अधिक बोलेन. ही वीरप्पन गँग कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे, असा निशाणाही त्यांनी ठाकरे गटावर साधला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com