Sandeep Deshpande: आमच्यामराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठी प्रेम हे पुतनामावशीच प्रेम
शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. मनसेच्या दीपोस्तवाचं यंदा अकरावे वर्ष असून गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते ‘दीपोत्सव २०२३’ चं उद्घाटन झालं. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपातर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात आशिष शेलार म्हणाले की, मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. कलाकाराला जात, धर्म, भाषा नसते. पण, गुरूवारी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन झालं.आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल. आम्ही गायक उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय. आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा? असे आशिष शेलार म्हणाले.
यावर आता मनसेचे संदिप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. संदिप देशपांडे म्हणाले की, आमच्यामराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठीप्रेम हे पुतनामावशीच प्रेमआहे. हिम्मत असेल तर गुजराथी ऐवजी मराठी माणसाला पंतप्रधानकरा मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेंव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहत आणि कोण पाठीला पाय लावून पळत महाराष्ट्राला माहित आहे. दीपावलीच्या शुभेच्छा.