'...तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय तर भावाला पण सोडले नाही'

'...तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय तर भावाला पण सोडले नाही'

सामनामधून केलेल्या टीकेला संदीप देशपांडे यांनी दिले प्रत्युत्तर

कल्पना नालस्कर | नागपूर : सामनामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लागवण्यात आलेला आहे. या टीकेला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो. तेव्हा राज साहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडले नाही. त्यामुळे त्याची चिंता सामनाने करू नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हिताचा विषय जेव्हा असतो. तेव्हा राज ठाकरे स्वतःच्या भावाचा देखील विचार करत नाही. त्यामुळे सामनाने राज ठाकरेंची चिंता करू नये. जेव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो. तेव्हा राज साहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडले नाही. त्यामुळे त्याची चिंता सामनाने करू नये. शिवसेनेचं आजचा आंदोलन हे नाटक आहे. ज्यावेळी मराठी मुलांच्या नोकऱ्या परप्रांतीय हिसकावते आणि मनसे महाराष्ट्रभर आंदोलन करत होते. राज ठाकरे यांना अटक झाली होती. त्यावेळेस शिवसेना मुग गिळून गप्प होती, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

काय म्हंटले आहे सामनाच्या अग्रलेखात?

फॉक्सकॉन ही फक्त सुरुवात आहे. आम्ही तुम्हाला मंत्रीपद दिले तुमच्या आमदारांना पाच सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे बरे झाले पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांना रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून राज ठाकरे यांचे मित्र भाजपवालेच आहेत, असा टोला आज सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे यांना लगावला होता.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com