बाजार समितीत संदिपान भुमरे यांचे वर्चस्व; महाविकास आघाडीला धक्का

बाजार समितीत संदिपान भुमरे यांचे वर्चस्व; महाविकास आघाडीला धक्का

पैठण येथील बाजार समितीचे निकाल स्पष्ट झाले आहे.

सुरेश वायभट | पैठण : पैठण येथील बाजार समितीचे निकाल स्पष्ट झाले आहे. पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या सर्वच जागांवर उमेदवार निवडून आले आहे. तर महाविकास आघाडीला 18 पैकी एकही जागा निवडून आणता आली नाही. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.

बाजार समितीत संदिपान भुमरे यांचे वर्चस्व; महाविकास आघाडीला धक्का
अजित पवार सभेला शरीराने राहतील, मात्र मनाने...; शिंदे आमदाराच्या विधानाने चर्चांना उधाण

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज मतमोजणी झाली. यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. यात सर्वच 18 जागांवर मंत्री संदिपान भुमरे यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. यावेळी पैठण शहरात विजयी उमेदवारारासह पालकमंत्री भुमरे यांची भव्य मिरवणूक काढत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com