संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ?

संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ?

अजित पवार आणि नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीच्या चर्चा

मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला. सभागृहात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले. संजय राऊतांवर हक्कभंगाचा आणण्याची जोरदार मागणी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आली आहे. परंतु, संजय राऊतांच्या वक्तव्या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादीने ठाकरे गटाची साथ सोडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. उलट अजित पवार आणि नाना पटोलेंकडून हक्कभंगाला समर्थन देणारी वक्तव्य झाल्याने ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही बोलले जात आहे.

संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ?
'राऊत सटकलंलं, आम्ही त्याला 10 मिनिटात पकडू व त्याची नशा बंदी करू'

काय म्हणाले अजित पवार?

कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला अशा पद्धतीने चोर मंडळ म्हणायचा अधिकार नाही. आशिष शेलार मी तुमच्या मताशी सहमत आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. या सभागृहाच्या सन्मानाबाबत असे वक्तव्य कोणीही करू नये. परंतु, त्या बातमीत नक्कीच तथ्य आहे का? याची शहानिशा करायला हवी. जर ती व्यक्ती तसे बोललेली असली तर त्यांना व्यवस्थित मेसेज देण्याचे काम केले पाहिजे, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

विधीमंडळाला चोर म्हटल्यावर सू-मोटो अधिकार आहे. अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत. त्यावरही बोलायचे आहे. वेळ न गमावता आपण निर्णय घ्यावा, असे पटोले म्हणाले आहेत.

अजित पवार व नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन ठाकरे गट नाराज झाल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्ष आक्रमक झालेले असतानाही दुसरीकडं मविआचे घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही सभागृहात मात्र शांतच बसलेले दिसले. हक्कभंग प्रस्ताव आणताच त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रतिक्रिया देण्यास घाई केली का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन भाजप नेते राम कदम यांनी मविआवर निशाणा साधला आहे. हे उद्धव गटच्या नेत्यांकडून अपेक्षित नव्हतं. यावरुन त्यांनी माफीही मागितली नाही. राऊतांना अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आज विधानभवनात उद्धव गटाला एकटं टाकल्याचे चित्र पूर्ण देशाने पाहिले असल्याचे कदमांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com