पंतप्रधान म्हणून मोदी फक्त गुजरातला वेळ देतात : संजय राऊत

पंतप्रधान म्हणून मोदी फक्त गुजरातला वेळ देतात : संजय राऊत

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच, भाजप नेते प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घतेला आहे.

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू होणार आहे. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आज मतदान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. तसेच, भाजप नेते प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घतेला आहे.

पंतप्रधान म्हणून मोदी फक्त गुजरातला वेळ देतात : संजय राऊत
महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात आशर यांचा मोठा आर्थिक हातभार; शिवसेनेचा आरोप

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधानांनी बराचसा वेळ गुजरातला दिला आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. पंतप्रधान म्हणूनही मोठा कालखंड त्यांनी गुजरातलाच दिला आहे. तरीही गुजरातची निवडणुक जिंकण्यासाठी पंतप्रधानांना बाजी लावावी लागली. यावरुन भाजपचे तिथे किती स्थान आहे हे स्पष्ट होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

खरे म्हणजे कोणत्याही प्रचाराशिवाय त्यांनी ती निवडणूक जिंकायला पाहिजे होती. पण, पंतप्रधान, गृहमंत्री व पक्षाचे अध्यक्ष संपूर्ण केंद्रीय यंत्रणा अशा तऱ्हेने गुजरातमध्ये प्रचार केला. निकाल काय लागणार सांगू शकत नाही. परंतु, लोक असे म्हणतात, निवडणूक यंत्रणेवर आमचा विश्वास नाही. म्हणजेच सरकारविरोधी लोकभावना असली तरी तेच जिंकतील. ही लोकशाही आहे असे होणार नाही, असेही त्यांनी म्हणटले आहे.

पंतप्रधान म्हणून मोदी फक्त गुजरातला वेळ देतात : संजय राऊत
'हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बोम्मईंचं थोबाड रंगवल असतं'

तर, प्रसाद लाड यांनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे विधान केले होते. यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरावरुन टीका करण्यात आली. यानंतर अखेर लाड यांनी वादग्रस्त विधानाप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी मान्य आहे का, छत्रपती राजा जन्माला आले होते हे तरी आपण स्वीकारताय का. भाजपलाही उत्तर द्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महारांजासोबत तुम्ही गद्दारी केली महाराष्ट्र दुर्लक्ष करणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजप नेते आशिष शेलारांनी कर्नाटकने अरे केल्यास कारेने उत्तर देऊ, असे म्हंटले होते. यावर ते म्हणाले की, आधी राज्यपालांच्या अरेला कारे करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता कारे तुम्ही छत्रपती शिवाजी महारांजांचा अपमान करत आहेत. त्यांची बदनामी करता हे आधी विचारा. पण, तुमच्या मनगटात एवढी ताकद नाही, अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com