चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागायची तुमच्यात हिम्मत आहे का? राऊतांचे टीकास्त्र

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागायची तुमच्यात हिम्मत आहे का? राऊतांचे टीकास्त्र

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदसंदर्भातील विधानावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे.

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदसंदर्भातील विधानावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विधानावर खुलासा केला आहे. माझा वक्तव्याचा विपर्यास केल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हंटले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या कोणत्याही वक्तव्याचा विपर्यास केलेला नाही. त्यांनी हिंदुतत्वाचा अपमान केला आहे. बाळासाहेब यांचा अपमान पत्रकार परिषद घेऊन प्रश्न सुटणार नाही. सरकारमध्ये ते मंत्री असून तुमच्यात हिम्मत आहे का चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागायची? नसेल तर आम्ही मिंधे आणि गुलाम आहोत हे मान्य करा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालतो हे ढोंग आहे. त्यांच्या मनातली मळमळ त्यांनी बाहेर काढली.

भाजपच्या शुद्ध घीच्या पोळ्या शिंदे गट खात आहेत. भाजप या दैवताची विटंबना करण्याची सुपारी घेऊन बसलेत व त्या सुपारीबाजांच्या पायाशी हे गुलाम बसलेले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.

तर, उदय सामंत यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, दाऊदचा संबंध इथे येत नाहीत. ते शिवसेनेआधी राष्ट्रवादी, काँग्रेस अशा पक्षत होते. त्यामुळे त्यांना बाळासाहेब माहित नाहीत. अशा बेडूक उड्या ते मारीत आहेत. वैचारीक बांधिलकी भावना आणि श्रध्दा यांच्याशी त्यांचा संबंध नाही, असा पलटवार त्यांनी सामंतांवर केला होतो.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्या विधानावर खुलासा केला होता. माझ्या वक्तव्याचा ध चा म केला जातोय. मातोश्रीसोबत माझे संबंध चांगले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलणार नाही. बाळासाहेब यांचा अनादर कधीच होणार नाही. जयंत पाटलांवर मी बोलणार नाही. उध्दव ठाकरेंवर बोलेन कारण ते माझ्या जवळचे संबध आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com