कुठल्याही शाखेवर अतिक्रमण केलं तर काल फक्त एक ट्रेलर होता, यापुढे...; राऊतांचा इशारा

कुठल्याही शाखेवर अतिक्रमण केलं तर काल फक्त एक ट्रेलर होता, यापुढे...; राऊतांचा इशारा

शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. या टीकेवरुन संजय राऊतांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेची मुंब्रा येथील शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंब्य्रातील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटात प्रचंड राडा देखील पहायला मिळाला. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रामध्ये काही फुसके बार येऊन गेले, असे म्हणत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कुठल्याही शाखेवर अतिक्रमण केलं तर काल फक्त एक ट्रेलर होता, यापुढे...; राऊतांचा इशारा
ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडवू नये; जरांगेंचे विधान

संजय राऊत म्हणाले की, शाखा शिवसेनेचे शाखा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ठाकरे यांची आहे. कुणाची सत्ता घटनाबाह्य आहे म्हणून शिवसेनेच्या शाखा त्यांच्या मालकीच्या होत नाहीत. 31 डिसेंबर नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

डुप्लीकेट शिवसेनेने जो माज दाखवला तो माज काल हजारो शिवसैनिकांनी उतरवला. काल सत्तेच्या जोरावर ते फुरफुरत होते त्यांचं काय करायचं ते पाहू नंतर. यापुढे कुठल्याही शाखेवर आक्रमण किंवा अतिक्रमण केलं तर काल फक्त एक झलक होतं, ट्रेलर होता. याच पद्धतीने सामुदायिकपणे तोडीस तोड उत्तर आणि प्रतिहल्ला केला जाईल, असा इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे.

ते भाजपचे मांडलिक आहेत. भाजपच्या प्रचाराला चार राज्यात जाणार आहेत. तिकडे ते खोके घेऊन जाणार आहेत. काही विचार आहे का चार राज्यात प्रचाराला जाण्यापेक्षा मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या आणि इथे प्रचार करा ही हिम्मत दाखवा, असे आवाहनही राऊतांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com