PM Modi | Sanjay Raut
PM Modi | Sanjay RautTeam Lokshahi

...आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो; राऊतांचा मोदी सरकारला टोला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो, असा टोलाही राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.

PM Modi | Sanjay Raut
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याकडून गोपनीयतेचा भंग; मतदानावेळी ईव्हीएम मशीनचा काढला फोटो

पुण्यात मतदानाची टक्केवारी आता जरी कमी असलं तरी ती वाढणार आहे. आज रविवार आणि त्यात पुण्याचा मतदार. पुणेकर मतदानासाठी उतरले की रांगा लागतील. प्रचारात पुणेकरांचा मोठा प्रतिसाद होता. 5 ते 6 मंत्री प्रत्येक मतदारसंघात फिरत होते. सरकारी यंत्रणांचा वापर केला जातोय. परभवाची भीती असली की दबावतंत्र वापर केला जातो, असा निशाणा संजय राऊतांनी भाजपवर साधला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट आहेत. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो. देशात क्रांतीची मशाल पेटवणारे ते महान क्रांतिकारक आहेत. सावरकर हे बाळासाहेब ठाकरेंचे प्रेरणास्थान होते. वीर सावरकर यांचा देशात वारंवार अपमान करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावं, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

शिंदे गटानं कार्यकारिणीत ठराव केलाय की मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा. आता केंद्रातील त्यांच्या महाशक्ती सरकारने दर्जा द्यावा. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच मराठी अस्मितेसाठी केली. 5 ते 6 वर्षांपासून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे हे दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, ओवैसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील तर सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेच ओवैसीकडे जातील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरेंवर केली होती. या टीकेचा समाचार संजय राऊतांनी घेतला आहे. ओवेसी आणि भाजपा हेच खरे रामश्याम आहेत. शिवसेना आपल्या पायावर मजबूतीने उभी आहे. जो सोडून गेले त्यांची पर्वा नाही, अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com