शेतकरी भाजपा सरकारला वैतागला आहे; निवडणुकीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

शेतकरी भाजपा सरकारला वैतागला आहे; निवडणुकीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

मुंबई : महाविकास आघाडीला बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालेय. याचाच अर्थ महाराष्ट्रातील शेतकरी हा या भाजपाच्या सरकारला वैतागलेला आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. यासोबत त्यांनी बारसू रिफायनरीबाबात वक्तव्य करताना नारायण राणे यांच्यावर देखील निशाणा साधला.

शेतकरी भाजपा सरकारला वैतागला आहे; निवडणुकीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
'मन की बात' प्रसादाच्या थाळीसारखी; 100 व्या भागामध्ये पंतप्रधान मोदींनी साधला जनतेशी संवाद

कृषी उत्पन्न बाजार समिती हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहेत. आतापर्यंत शिवसेना या निवडणुकीमध्ये फार ताकदीने उतरली नव्हती. परंतु, यावेळी शिवसेना महाविकास आघाडीसह बाजार उत्पन्न समितीमध्ये उतरली आणि भारतीय जनता पार्टी कोणतेही आकडे लावू देत आपण सगळे आकडे पाहिलेले आहेत. महाविकास आघाडीला बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठे यश मिळालेले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील शेतकरी हा या भाजपाच्या सरकारला वैतागलेला आहे. त्यांना घालवायला निघालेला आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

मुळात या ठिकाणी मिंधे गटातील सगळे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील जेवढे शिवसेनेचे व राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पॅनल उभे होते ते जिंकून आलेले आहेत. हे लोकांची मन की बात स्पष्ट झालेली आहे. या ठिकाणी पारोळा, मालेगाव अन्य ठिकाणी देखील शिवसेनेच्या गद्दार आमदारांच्या प्रत्येक भागामध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पॅनल या ठिकाणी आलेला आहे. हा लोकमतचा कौल आहे. आम्ही वारंवार सांगत आहोत की या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाऊया. पण हे लोक सामोरे जात नाही. हे लोक निवडणुकीला सामोरे जायला घाबरत आहेत. कोणतीही निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकून येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीची उद्या वज्रमूठ सभा या ठिकाणी होणार आहे अतिविराट अशा प्रकारची सभा होणार आहे. दोन सभांनंतर यावेळी आता महाराष्ट्राच्या राजधानीमध्येही सभा होत आहे आणि ही सभा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली होत आहे. तसेच महाविकास आघाडीची देखील मोठी या ठिकाणी तयारी होत आहे. आदित्य ठाकरे यांनी विशेष मेहनत या सभेसाठी घेतलेली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. उद्याच्या या ठिकाणी सभेनंतर आणखीन चित्र स्पष्ट होईल, असेदेखील ते म्हणाले आहेत.

अमित शहा सध्या महाराष्ट्रात आले असून आमच्या सभेची तयारी पाहण्यासाठी आले आहेत. ते नागपूरला सभा होते तेव्हा देखील महाराष्ट्रातील खारघर याठिकाणी आलेले होते. आता उद्या आमची सभा आहे त्यावेळी सभेचा आवाका सभेचा जोश पाहण्यासाठी देशाचे गृहमंत्री जर आले असतील तर त्यांचे स्वागत आहे, असा खुले निमंत्रणच त्यांनी दिलेले आहे.

दरम्यान, बारसूचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे अजूनही तेथे अत्याचार सुरू असून पोलीस कारवाया सुरू आहेत. तिथे शेतकरी महिलांवरती जोरजबरदस्ती सुरू आहे हे सगळं कोणासाठी? उद्धव ठाकरे यांना कोकणामध्ये पाय ठेवून देणार नाही, अशी देखील धमकी आहे. परंतु, अशा धमक्याना शिवसेना भीक घालत नाही. आम्ही आता देखील कोकणात जाणार आहे या ठिकाणी आम्हाला अडवून दाखवा, असे खुले आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com