फुटीर आमदारांच्या कुत्र्या-मांजरालाही सुरक्षा देतात; राऊतांचा निशाणा

फुटीर आमदारांच्या कुत्र्या-मांजरालाही सुरक्षा देतात; राऊतांचा निशाणा

संजय राऊतांनी सोडले शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

मुंबई : फुटीर आमदारांच्या कुत्र्या-मांजराला सुध्दा सुरक्षा देतात. परंतु, विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांना सुरक्षा नाही, असे टीकास्त्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले आहे. शिंदे सरकारकडून ठाकरे गटातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. याविरोधात शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे. यावरुन राऊतांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

फुटीर आमदारांच्या कुत्र्या-मांजरालाही सुरक्षा देतात; राऊतांचा निशाणा
सुप्रिया सुळेंनी केली अजित पवारांची पाठराखण; म्हणाल्या...

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर संजय राऊत म्हणाले की, भाजपचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आधी परत पाठवले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा साधा निषेध सुद्धा करत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, आशिष शेलार हे शंकराचार्य आहेत का? त्यांनी आधी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांची हकालपट्टी करावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायलयाने नोटबंदी वैध ठरवल्याच्या निर्णयावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी सहमत आहे. नोटांवर बंदी घालण्यात आली. यावेळी ‌अनेकांचा मृत्यू झाला, नुकसान झाले याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

फुटीर आमदारांच्या कुत्र्या-मांजरालाही सुरक्षा देतात; राऊतांचा निशाणा
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की...; राज ठाकरेंनी टोचले कान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, मुंबई औद्योगिक शहर आहे. गुंतवणूकीबाबतीत चर्चेला विरोध नाही. राज्याबद्दल विरोध नाही. परंतु, आमचा विकास ओरबाडून नेऊ नका, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, फुटीर आमदारांच्या कुत्र्या-मांजराला सुध्दा सुरक्षा देतात. परंतु, विरोधी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांना सुरक्षा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातील सुरक्षा बघा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com