आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये काय? संजय राऊतांनी सांगून टाकलं...
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कसिनोमधील एक फोटो शेअर केला आहे. तसेच महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप केला. या फोटोवरुन आता राजकारण तापलं आहे. यावरुन राजकीय वर्तळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मकाऊत जायला हरकत नाही. मी कुठे म्हटलं तिथे जाणं हा गुन्हा आहे. भाजपाने माझं ट्विट अंगावर ओढून का घेतलं? बानवकुळेंच्यासोबत आणखी काहीजण होते. बावनकुळेंनी तिथे 3 कोटींचे पोकर्स विकत घेतलं. माझ्याकडे आणखी व्हिडिओ आहेत. फोटोमुळे तुमचं मन तुम्हाला का खातंय? तुम्ही इतकं मनाला का लावून घेत आहात.
तसेच ते पुढे म्हणाले की, तुम्ही ती कृती का नाकारत आहात. त्यांचं कुटुंब फोटोत कुठेच दिसत नाही आहे. आदित्य ठाकरेंच्या हातातील ग्लासमध्ये डायट कोक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो मी टाकू का? भाजपाच्या लोकांचे अच्छे दिन आलेत. आदित्य ठाकरेंचा कोणता फोटो ट्विट करतो याचे भान नाही. भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी. भाजपासारखा भ्रष्ट पक्ष देशात नाही. असे राऊत म्हणाले.