राजकारण
Sanjay Raut : आम्हालाही फुटण्यासाठी दिल्लीतून फोन आले
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, केंद्र सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे. मुंबईच्या संपत्तीवर त्यांना ताबा हवा आहे. त्यांनी मुंबई गिळायची आहे विकायची आहे. मुंबईच्या माणसाला कंगाल करण्याचे कारस्थान त्यांनी रचलं. हे सर्व शिवसेनेनं होऊ दिलं नसते. त्याच्यामुळे शिवसेना फोडण्यात आली. अत्यंत लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवर बसवलं.
तसेच. आमच्यासोबत अनेकांना ऑफर आल्या. दबाव आले. पण आम्ही फुटणार आहोत का? आम्ही तुरुंगात गेलो ना. तुरुंगात जायचे नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा. आम्हालाही दिल्लीतून फोन आले. जे आते गेले आहेत ना त्यांना 2024 साली पश्चाताप होईल. असे राऊत म्हणाले.