आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल; Sanjay Raut म्हणाले...
लोअर परळ येथील डिलाईल रोडचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांनी उद्घाटन केल्याचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता मुंबई महानगरपालिकाही अॅक्शन मोडवर आली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून लोअर परळ पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर मात्र पालिकेने उर्वरित काम पूर्ण करण्याचा वेग वाढवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीर रित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाईल रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, राजकीय हेतून आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. राजकीय हेतूपोटी गुन्हा दाखल झाला असेल तर आम्ही सामोरं जाऊ. जनतेच्या सोयीसाठी आदित्य ठाकरेंनी पुलाचं उद्घाटन केलं. पुलाचं उद्घाटन करण्यात राजकीय स्वार्थ नाही. राज्यात बेकायदेशीर सरकार, त्याविरोधात गुन्हा नाही. एकतर्फी गुन्हे दाखल करत असाल तर आम्हाला पर्वा नाही. असे राऊत म्हणाले.