कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; Sanjay Raut म्हणाले, मी या दडपशाहीचा धिक्कार करतो

कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; Sanjay Raut म्हणाले, मी या दडपशाहीचा धिक्कार करतो

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई : किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे. 

याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कोणतीही सखोल चौकशी न करता लोकशाही चॅनल व संपादक कमलेश सुतार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे धक्कादायक आहे. सुतार यांनी एका भंपकआणि महाराष्ट्र द्वेषाची गरळ सतत ओकणारया व्यक्तीचा खरा चेहरा उघड केला.पण चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे.नागरी स्वातंत्र्याची चाड असणाऱ्या प्रत्येकाने आता या वर आवाज उठवायला हवा.पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर देखील याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून.. मी या दडपशाहीचा धिक्कार करतो.याचा जाब 2024 ला द्यावाच लागेल! असे राऊत म्हणाले.

 कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; Sanjay Raut म्हणाले, मी या दडपशाहीचा धिक्कार करतो
Kirit Somaiya Video : राज्यातील पत्रकार संघटनांचा कमलेश सुतारांना पाठिंबा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com