राजकारण
छगन भुजबळ यांचा येवल्यात पराभव करणार - संजय राऊत
छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादीत बंड करुन अजित पवार यांच्या गटात सामील झाले.
छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादीत बंड करुन अजित पवार यांच्या गटात सामील झाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली जाहीर सभा नाशिकमध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भुजबळ विधानसभेत नसतील. आम्ही मुंबईत त्यांचा पराभव घडवून दाखवला आहे. नाशिकला लोकसभेत त्यांचा पराभव केला आहे. येवल्याचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा असेल. आता येवल्यात भुजबळांचा पराभव करु. मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. असे राऊत म्हणाले.