राजकारण
Sanjay Raut : 24 तासांमध्ये आरक्षण देऊ म्हणणाऱ्यांचे फुलबाजे आता विझले का?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार काही करू इच्छित नाही. सरकार केवळ आश्वासन देतं. फडणवीसांनी धनगर, मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? आमचं सरकार आल्यास 24 तासांत मराठा आरक्षण देऊ म्हणणारे फडणवीस आता काय करत आहेत? ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले.
24 तासांमध्ये आरक्षण देऊ म्हणणाऱ्यांचे फुलबाजे आता विझले का? जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. महाराष्ट्रातील वातावरण कधी नव्हे इतके अस्थिर, असुरक्षित नव्हते. असे संजय राऊत म्हणाले.