"...म्हणून स्वःतची अटक टाळण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष फोडले" - संजय राऊत

"...म्हणून स्वःतची अटक टाळण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष फोडले" - संजय राऊत

मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेंना अटकेची भीती दाखवली.
Published by :
Dhanshree Shintre

फडणवीसांच्या मनात अटकेची भीती होती. फोन टॅपिंग प्रकरणामुळे फडणवीसांना अटकेची भीती असेल. सध्याचे मुख्यमंत्री असे म्हणतायेत स्वःत ते शिंदे ज्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होते ते सरकार मी व्यक्तीशाह उद्धव ठाकरे म्हणत नाही, सरकार कारवाई करतं. त्यांनी काय सांगितलं आहे की फडणवीस, गिरीश महाजन, दरेकर, शेलार, लाड यांची नावं घेतली का? जर त्यांनी काय अपराध केले असतील, आर्थिक गुन्हे असतील, इतर काही अपराध असतील तिथे आम्हाला कायदा हात लावू शकत नाही. हे कोण आहेत हे कायद्याच्या वर आहेत का? या देशामध्ये प्रधानमंत्र्यांवर पण कारवाई झाली आहे. राज्यपालांवर कारवाई झाली आहे, विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मोदी सरकारने अटक केली. अनेक मंत्री, आमदार, खासदारांना या महाराष्ट्रात आणि देशाभरात अटक झाली. मग हे जे पंचक आहे ज्यांची नावं घेतली शिंदेंनी त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्यांची चौकशी करत असेल माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप होता हा अत्यंत गंभीर आरोप आहे. भारतीय टेलिग्राफ कायदा, भारतीय पुरावा कायदा आणि इतर काही कायदे त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर पाळत ठेवली. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकूमावरुन तेव्हा रश्मी शुक्ला प्रमुख होत्या त्या खात्याच्या. त्यांची चौकशी सुरु होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करु लागले हे सत्य आहे. जगभरामध्ये हे असे गुन्हे अत्यंत भयंकर गुन्हे मानले जातात आणि अमेरिका असेल, युरोप असेल आणि आपला देश असेल जे अशा गुन्हेगाराला तात्काळ अटक केली जाते. मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेंना अटकेची भीती दाखवली हो की नाही विचारा. एकनाथ शिंदेंनी सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं कारण सांगू शकतात मी सांगतो नाहीतर. एकनाश शिंदेंवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा नाहीतर तुम्हाला अटक करु.

प्रवीण दरेकर यांच्यावर का कारवाई करु नये त्यांच्यावरती मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप तेव्हा होता आणि त्याची चौकशी तेव्हा सुरु होती. बेकायदेशीरपणे कर्जवितरण. लाड वैगेरे जे लोकं आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे आहेत. पोलिसांनी तपास वैगेरे करु नये असं यांचं म्हणणं आहे का? डरपोक लोकं आहेत हे म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वःतची अटक टाळण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं नाहीतर यांच्यावर गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक होतील अशा प्रकारचे होते.

सरकार येईल केंद्रातील सरकार 100% बदलतंय. तेव्हा हे जे तुम्ही सत्तेत आल्यावर गुन्हे रद्द केले, एफआयआर रद्द केले, चौकश्या रद्द केल्या आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा त्या चौकश्या लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल, कायदेशीर म्हणतोय तुम्ही करताय तसं बेकायदेशीर नाही असा इशारा संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com