Sanjay Raut On Devendra Fadnavis | आम्हाला कुणाला पुरावा देण्याची गरज नाही; राऊतांचं उत्तर

राम मंदिर आंदोलनात देशभरातून हजारो कारसेवक गेले होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राम मंदिर आंदोलनावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात खडाजंगी सुरु आहे.

मुंबई : राम मंदिर आंदोलनात देशभरातून हजारो कारसेवक गेले होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राम मंदिर आंदोलनावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात खडाजंगी सुरु आहे.

बाबरी मशीद पडली त्यावेळी भाजपवाले बिळात लपले होते, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. आता या वादात देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला. हा फोटो नागपूर रेल्व स्टेशनवरचा फोटो असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या ट्विटला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला काय पुरावा द्यायचा? तुमचे लोक तिथून पळून गेले. बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्विकारली. नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हिडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com