Sanjay Raut : निवडणूक आयोग मोदी, शाहांचा आयोग झालाय

Sanjay Raut : निवडणूक आयोग मोदी, शाहांचा आयोग झालाय

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा हीच मोदी गॅरंटी. मोदी राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हणायचे. निवडणूक आयोग मोदी, शाहांचा आयोग झालाय. शिवसेना, राष्ट्रवादी मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते. जेथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं. मोदी, शाहांचा महाराष्ट्रावर राग. हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढा. ठामपणे लढण्यास शरद पवार तयार आहेत. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com