राजकारण
संसदेच्या विशेष अधिवेशनावर राऊतांची टीका, म्हणाले, 'हे बारश्याचं की लग्नाचं निमंत्रण...
केंद्र सरकारनं संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे.
केंद्र सरकारनं संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, या अधिवेशनाचा नक्की अजेंडा काय आहे. हे काय सुरू आहे देशात?
हे निमंत्रण बारश्याचं आहे का? लग्नाचं आहे का? मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय? की भाजपचा निरोप समारंभ आहे?सरकारनं अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे? फक्त अनन्यसाधारण परिस्थितीतच अधिवेशन बोलावलं जातं. असे राऊत म्हणाले.