पंतप्रधान मोदींचे असे किती फोटो दाखवू : Sanjay Raut

पंतप्रधान मोदींचे असे किती फोटो दाखवू : Sanjay Raut

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कसिनोमधील एक फोटो शेअर केला आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कसिनोमधील एक फोटो शेअर केला आहे. तसेच महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप केला. या फोटोवरुन आता राजकारण तापलं आहे. यावरुन राजकीय वर्तळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, मकाऊत जायला हरकत नाही. मी कुठे म्हटलं तिथे जाणं हा गुन्हा आहे. भाजपाने माझं ट्विट अंगावर ओढून का घेतलं? बानवकुळेंच्यासोबत आणखी काहीजण होते. बावनकुळेंनी तिथे 3 कोटींचे पोकर्स विकत घेतलं. माझ्याकडे आणखी व्हिडिओ आहेत. फोटोमुळे तुमचं मन तुम्हाला का खातंय? तुम्ही इतकं मनाला का लावून घेत आहात.

तुम्ही ती कृती का नाकारत आहात. त्यांचं कुटुंब फोटोत कुठेच दिसत नाही आहे. आदित्य ठाकरेंच्या हातातील ग्लासमध्ये डायट कोक होते. पंतप्रधान मोदींचे असे किती फोटो दाखवू. भाजपाच्या लोकांचे अच्छे दिन आलेत. आदित्य ठाकरेंचा कोणता फोटो ट्विट करतो याचे भान नाही. भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी. भाजपासारखा भ्रष्ट पक्ष देशात नाही. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com