Sanjay Raut : नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं

Sanjay Raut : नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. निकालानंतर लोकांच्या मनात चीड आहे. मॅच फिक्सिंग करुन निकाल दिल्यामुळे आम्हाला धक्का बसला नाही. शिंदे गटाची वकीली करावी अशा प्रकारे निकालाचे वाचन सुरु होते. नार्वेकरांनी नोंदवलेलं आक्षेप पूर्णपणे खोटे आहेत. गोगावलेंची निवड चुकीची कोर्टानं सांगितले होते. कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झालं.

आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, आम्हाला न्याय मिळेल. सत्य आणि न्यायाचा नेहमी विजय होतो. नार्वेकरांकडून काल चोरांची वकीली. बेईमान गटाच्या लोकांनी मनाला विचारावं, कालचा निकाल खरा की खोटा. आमच्यावर घराणेशाहीची टीका करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय? सुप्रीम कोर्टाला खोटं ठरवण्याचा प्रकार भाजपानं केला. बाळासाहेबांची शिवसेना सहज कुणालाही गिळता येणार नाही. चोरांना चोर नाही तर काय म्हणणार. असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं
Girish Mahajan : निकाल चुकीचा वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालयात जा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com