ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊतांनी सरळ सांगून टाकले...

ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊतांनी सरळ सांगून टाकले...

लोकशाही मराठीने खासदार संजय राऊत यांच्यासोबत एक्सक्लुझिव बातचित केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकशाही मराठीने खासदार संजय राऊत यांच्यासोबत एक्सक्लुझिव बातचित केली आहे. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यावर उत्तर देत राऊतांनी जोरदार हल्लाबोल करत काही खुलासे केले आहेत.

यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, सगळीकडे राज ठाकरे - उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे पोस्टर लावण्यात येत आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, यावर तुमची प्रतिक्रिया काय?

यावर उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, दोन भाऊ एकत्र असताना आम्ही सर्व एकत्रच होतो. राज ठाकरे माझे जवळचे मित्र आहेत. तरुण वयात आणि लहाणपणापासूनचे आम्ही मित्र आहोत. आम्हीसुद्धा नात्यांचा, भावनांचा काळ बघितला आहे. पक्ष फुटावे कुटुंब फुटू नये या मताचा मी आहे. मतभेद झाले पक्ष फुटले. घर आणि राजकारण याची जेव्हा गल्लत होते तेव्हा अस्वस्थता मनामध्ये निर्माण होते. या क्षणाला आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत. 3 पक्षात अजून कुणाला घ्यायेच अजून या पक्षात 3 पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी लागेल. माझ्या नेत्यांचे मन यावर काय आहे हे समजून घेऊ. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com