रोहित पवारांची आज ईडी चौकशी; संजय राऊत म्हणाले...

रोहित पवारांची आज ईडी चौकशी; संजय राऊत म्हणाले...

बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती.
Published by :
Siddhi Naringrekar

बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. बारामती अ‍ॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा ही स्वतंत्र यंत्रणा राहिली नाही. ती भाजपची शाखा झाली आहे. लोकशाहीसाठी हुकुमशाही विरोधात आवाज उठवतील त्यांना भाजप ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते. मी त्या त्रासातून गेलो आहे, अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण ईडी ग्रस्त आहेत ईडीला घाबरून तिकडे गेले. ईडी तिथे नोटीस पाठवत नाही. पेडणेकर, चव्हाण, वायकर यांना नोटीस पाठवते. ईडी संजय राऊत यांना अटक करते. ईडी भाजपाची शाखा झाली आहे. जे भाजपच्या भ्रष्टाचार बाहेर काढतात त्यांना आत टाकले जाते.

रामाच्या भक्तीचे नाटक करताय आणि दुसऱ्या बाजूला असत्याची कास धरून कारवाई करतात. पश्चिम बंगालमध्ये आज छापे पडले. भ्रष्ट असलेले आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई नाही. आम्हाला ज्ञान देताय तुमच्या खाली जाळ पाहा. शिवसेनेचे जे अधिवेशन झाले, गंगा आरती झाली त्याचा अर्थ असा होता ईडीच्या विरोधात एकवटले पाहिजे. देशाची सत्ता घेऊन मनमानी थांबवायची आहे महाराष्ट्राला पुढाकार घेऊन भाजप मुक्त राम करण्यासाठी आंदोलन करावे लागणार. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com