केंद्राच्या दबावापोटी सुरू असलेला डाव उधळला जाईल : संजय राऊत

केंद्राच्या दबावापोटी सुरू असलेला डाव उधळला जाईल : संजय राऊत

शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर 12 जानेवारीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे.

मुंबई : शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर 12 जानेवारीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राजकीय दबावापोटी केंद्राच्या ते डाव उधळला जाईल आणि या देशांवर घटनांनी न्याय निर्माण केला आहे ते शाबूत आहे हे देशाला दिसून येईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्राच्या दबावापोटी सुरू असलेला डाव उधळला जाईल : संजय राऊत
शिवसेना व वंचितच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध? शरद पवार म्हणाले...

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या सर्व नेमणूका सरकार आपल्या मर्जीने करते. तरी आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवतो. पक्षाबद्दल निर्णय घेतले जातील ही एक स्वायत्त संस्था आहे. आम्हाला आतापर्यंत स्वातंत्र्य आणि स्वायत्तता दिसला नाही तरी आम्ही देशाचा प्रमुख स्तंभ आहे त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो.

सर्वोच्च न्यायालयावरती आम्ही विश्वास ठेवतो. अजून या देशांमध्ये संविधान न्याय आणि कायदा जिवंत आहे असे आम्ही मानतो. काय घटनाबाह्य महाराष्ट्रामध्ये जे काही घडवलेला आहे. राजकीय दबावापोटी केंद्राच्या ते डाव उधळला जाईल आणि या देशांवर घटनांनी न्याय निर्माण केला आहे ते शाबूत आहे हे देशाला दिसून येईल. आणि आम्ही संपूर्णपणे तयारी यासाठी केलेले आहे. जे गेलेले आहे त्यांच्यामुळे काही फरक पडत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com