तुरुंगात राहणं फारच कठीण; संजय राऊतांची प्रतिक्रिया

तुरुंगात राहणं फारच कठीण; संजय राऊतांची प्रतिक्रिया

संजय राऊत तुरुंगातून सुटल्यानंतर आज उध्दव ठाकरे व शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत तुरुंगातून सुटल्यानंतर आज शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वांसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणतीही टीका न करता आज तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधले आहे, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी कोणावरही टीका-टीप्पणी न केल्याने राजकीय वर्तुळातून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तुरुंगात राहणं फारच कठीण; संजय राऊतांची प्रतिक्रिया
हिंदुत्वादी सरकार, नाद नाही करायचा : नितेश राणे

संजय राऊत म्हणाले की, आज तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधले आहे. तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरुंगात राहणं फारच कठीण असतं. तुरुंगात राहणे काही आनंदाची गोष्ट नाही. तुरुंगातील भिंतींसोबत बोलावे लागते. वीर सावरकर, लोकमान्य टिळक, अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये कसे राहीले असतील, याचा मी नेहमी करतो. मी आज आज मी उध्दव ठाकरेंना भेटणार आहे. तसेच, शरद पवारांनी फोन केला होता. त्यांना माझी काळजी आहे. त्यांनाही मी भेटणार आहे.

मी ईडीवर कोणतीही टीप्पणी करणार नाही. ज्यांनी कारस्थान रचली त्यांना आनंद मिळाला असेल तर मीही त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझी कोणाविषयीही तक्रार नाही. मी, माझ्या पक्षाने आणि माझ्या कुटुंबाने खूप काही सहन केले आहे. याप्रकराचे राजकारण देशाने आजवर बघितले नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तुरुंगात राहणं फारच कठीण; संजय राऊतांची प्रतिक्रिया
शिंदे-फडणवीस सरकारतर्फे हालचालींना वेग? आरे आंदोलन प्रकरणी तरुणाला तडीपारीची नोटीस

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी एकदा भाषणात सांगितले होते की, राऊतांना ईडीकडून अटक होईल. त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टीस करावी, असे म्हणत संजय राऊत पुढे म्हणाले, मला ईडीकडून अटक झाली. ती बेकायदेशीर होती, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. परंतु, राज्यामध्ये शत्रूंप्रती ते जेलमध्ये जावे, अशा भावना व्यक्त करु नये. पण, मी एकांतमधील वेळ सत्कारणी लावला, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com