मविआत राष्ट्रवादीच मोठा भाऊ! अजित पवारांच्या विधानावर राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले,  डीएनए टेस्ट...

मविआत राष्ट्रवादीच मोठा भाऊ! अजित पवारांच्या विधानावर राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, डीएनए टेस्ट...

अजित पवारांच्या विधानावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले

मुंबई : महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आणि ठाकरे गटचे विधानसभेत संख्याबळ कमी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ आहे, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही एकदा सगळ्यांची डीएनए टेस्ट करू, असा टोला राऊतांनी अजित पवारांना लगावला आहे. तसेच, हा विनोद समजून घ्या. असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मविआत राष्ट्रवादीच मोठा भाऊ! अजित पवारांच्या विधानावर राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले,  डीएनए टेस्ट...
शकुनीमामाचा बीड मध्ये FLOP शो; महाप्रबोधन यात्रेची राणे-सामंतांनी उडवली खिल्ली

लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? यापेक्षा प्रत्येकजण आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.

लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत काय ठरतंय हे मी तुम्हाला बाहेर सांगणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, कॉंग्रेसमध्ये जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण, महाविकास आघाडीत आता आपण काँग्रेस व ठाकरे गटापेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण आपल्याकडे अधिक जागा आहेत, असे विधान अजित पवार यांनी केलं होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com