...म्हणून मला अटक करण्यात आली; संजय राऊतांनी सांगितले कारण

...म्हणून मला अटक करण्यात आली; संजय राऊतांनी सांगितले कारण

संजय राऊतांनी आपल्याला अटक का झाली याबाबतचे सांगितले कारण

मुंबई : राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर राज्यभरातून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. या विषयावरुन लक्ष विचलीत होण्यासाठीच भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले हे स्क्रिप्ट असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तर, यावेळी त्यांनी आपल्याला अटक का झाली याबद्दलही सांगितले आहे.

...म्हणून मला अटक करण्यात आली; संजय राऊतांनी सांगितले कारण
शिंदे गटाच्या आमदारांकडून शरद पवारांचे कौतुक, चर्चेला उधाण

संजय राऊत म्हणाले की, गुजराती व मारवाडी निघून गेले तर मुंबई महाराष्ट्रची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपालांनी केले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच संजय राऊतांना अटक झाली. ही यांची सर्व स्क्रिप्ट तयार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. आताही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान लोकांनी विसरावा म्हणून सीमाभागाचा विषय वेगळ्या पध्दतीने काढून महाराष्ट्रावर हक्क सांगण्यात आला आहे. ही भाजपनेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले हे स्क्रिप्ट आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात नवे महाभारत घडू शकते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाहीये. त्यांना खोके दिले की हे गप्प बसतील. महाराष्ट्राला विसरतील. पण, शिवसेना विसरणार नाही. तुम्ही किती कारस्थाने केली तरी महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी रणशिंग फुंकलेले आहे. आणि महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत. आणि ती लढाई कोणत्याबही थराला जाईल, असा इशाराही संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सराकारला दिला आहे.

...म्हणून मला अटक करण्यात आली; संजय राऊतांनी सांगितले कारण
भाजपनेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले 'हे' स्क्रिप्ट; राऊतांचा आरोप

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यापुर्वी एका कार्यक्रमात मुंबईविषयी भाष्य केले होते. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई महाराष्ट्रची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य कोश्यारींनी केलं होते. या वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झााला होता. यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी सारवासारव करत नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान, संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर 100 दिवसानी राऊत यांना जामीन मिळाला होता. मात्र, संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीकडून विरोध करण्यात आला होता. याविरोधात ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com