Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

निवडणूक आयोगावर संजय राऊतांची शिवराळ भाषेत सडकून टीका; म्हणाले...

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली आहे.

संजय देसाई | सांगली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली आहे. थेट निवडणूक आयोगाचा बाप काढत राऊत यांनी 'भोसडीच्या' अशी शिवी दिली आहे. तसेच, शिवसेना ही निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा संतप्त सवाल करत आपले असंसदीय शब्द जरी असले तर तो आपला संताप आहे, असं स्पष्ट केला आहे. ते सांगलीच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.

Sanjay Raut
भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवा; बच्चू कडूंचा सरकारला सल्ला

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा शिवसैनिकांचा मेळावा आज सांगली मध्ये पार पडला आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. ही टीका करताना राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिव्या देखील घातल्या आहेत.

ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी निवडून दिलं ते आज इथेच आहेत आणि ते 50 खोके घेऊन पळून गेले आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची. शिवसेना तुझ्या बापाची आहे का? भोसडीच्या. शिवसेना ही काय निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. 50-55 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, यावरून पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना निवडणूक आयोगाबाबत वापरण्यात आलेल्या शिवराळ भाषेबाबत विचारला असता त्यांनी त्या शब्दांवर ठाम भूमिका घेत, मग होऊ दे ना ट्रोल, अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय, असं स्पष्टीकरण दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com