Devendra Fadnavis | Sanjay Raut
Devendra Fadnavis | Sanjay RautTeam Lokshahi

फडणवीसांना सनसनाटी निर्माण करायचा छंद; राऊतांचा निशाणा

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यास्फोटावर संजय राऊतांचे टीकास्त्र

मुंबई : राज्यात राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच एकापाठोपाठ गौप्यस्फोटाचे सत्र सुरु आहे. नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले तेव्हा मला उद्धवजींनी संपर्क केला होता. व तुम्ही मुख्यमंत्री व्हा, असे फडणवीसांनी सांगितले आहे. यावर आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis | Sanjay Raut
चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार! मतदारांना पैसे वाटप करताना तिघांना रंगेहाथ पकडलं

देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायचा छंद आहे. आधी फडणवीस असे नव्हते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचीच ऑफर दिली होती. आज उपमुख्यमंत्री आहात, किती दिवस राहतील बघू, असा निशाणा राऊतांनी साधाला आहे.

प्रतिष्ठीत कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला. परंतु, चिंचवड विधानसभेत मतदारांना पैसे वाटप करताना तिघांना रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, पोलीस पोलिटीकल एजंट बनून पैसे वाटतात. हे पुराव्यासह उघड झालं. धंगेकरांनी आरोप केले म्हणजे पक्की माहिती असणार. सरकारच्या मनात निवडणुकीला सामोरं जायचं भर. सरकार पाडण्यात निर्लज्जपणा आणि बेडरपणा दाखवतात. तो बेडरपणा निवडणुका घ्यायला दाखवा, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com