पद आणि पक्ष काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का? राऊतांचा घणाघात

पद आणि पक्ष काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का? राऊतांचा घणाघात

उद्धव ठाकरे यांचे मालेगावात सभा होत असून त्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची शिवगर्जना आढावा बैठक संजय राऊतांनी घेतली.

संदीप जेजुरकर | नाशिक : पद आणि पक्ष काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. २६ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांचे मालेगावात सभा होत असून त्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची शिवगर्जना आढावा बैठकीत ते बोलत होते.

पद आणि पक्ष काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का? राऊतांचा घणाघात
शिंदे-फडणवीसांना सरकार जाण्याची चाहुल लागली; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर पटोलेंचा निशाणा

राज्यात सत्तेवर असलेले सरकार बेकायदेशीर आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर विचार होणार आहे. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हे बेकायदेशीर सरकार शंभर टक्के जाणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, २६ तारखेला मालेगावला उध्दव ठाकरे यांची सभा होणार आहे. ते या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना पाडण्यासाठी नव्हे तर गाडण्यासाठी येणार आहे. ज्यांना शिवसेनेने सर्वकाही दिले, ते सत्तेसाठी सोडून गेलेल्या व लाचार असलेल्या या गद्दारांना पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, असा पुनरुच्चार खा.संजय राऊत यांनी केला.

निवडणूक आयोगाचाही राऊतांनी खास शैलीत समाचार घेतला. पक्ष आणि पद काढून घ्यायची निवडणूक आयोगाची लायकी आहे का? असा घणाघातही राऊत यांनी केला. शेतकरी कष्टकरी रस्त्यावर उतरले असून त्यांच्यावरील या सरकारकडे नैतिकता उरलेली नाही. दरम्यान, मालेगावची जागा ही शिवसेनेची असून येणाऱ्या काळात शिवसेना उपनेते अद्वय हिरे सभागृहात दिसतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com