Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi

खत्म होते देखा है....वर्षाच्या शेवटच्या दिवशी संजय राऊतांचे खास ट्विट

राऊतांच्या या शायरीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठी हानी झाली. या बंडखोरीमुळे शिवसेनेसाठी 2022 वर्ष वाईट ठरलं. या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटात सध्या प्रचंड आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. या दरम्यान राऊतांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याच वर्षी सुमारे १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राऊतांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे एक शायरी ट्विटर शेअर केली आहे.

Sanjay Raut
मंत्री देसाईंचे शरद पवार यांना प्रत्युत्तर; म्हणाले, लहान मुलगाही....

असे आहे संजय राऊत यांचे ट्विट?

संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये मिथीलेश बारीया यांची चारोळी शेअर केली आहे. “कौन कहता हैं वक्त मरता नही… हमने सालों को खत्म होते देखा है डिसेंबर में…!” अशी शायरी संजय राऊतांनी शेअर केली आहे. राऊतांच्या या शायरीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com