Aditya Thackeray | Sanjay Shirsat
Aditya Thackeray | Sanjay ShirsatTeam Lokshahi

...तर त्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे; संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

विधिमंडळातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : विधिमंडळातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही माझे आजोबा गद्दारांच्या हाताने तैल चित्राचं अनावरण केलं असं म्हटले असते? असे म्हणाले असता संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाले आहेत. असं म्हणणाऱ्याच्या थोबाडीत मारली पाहिजे, अशा शब्दात शिरसाटांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

Aditya Thackeray | Sanjay Shirsat
प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा संबंध काय; नारायण राणेंचा घणाघात

आदित्य ठाकरे बच्चा आहे. त्यांनी राजकारणात पीएचडी केलेला आहे का? मग काय त्याच तैलचित्र लावावं का? शिवसेनाप्रमुखांच तैलचित्र लावल तर त्याच वाईट वाटत का, असे प्रश्नही संजय शिरसाट यांनी विचारले आहे. तर, उद्धव ठाकरे तैलचित्र अनावरणाला जात नाही, याच गोष्टीच वाईट वाटतं, आम्हाला तरी त्यांनी घडवल, पण तुम्ही त्यांचे वारसदार आहात. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच होत पण आम्ही भांडून बाळासाहेब ठाकरेंच नाव घेतले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

कुणी 50 खोके घेतले तर कुणी 9 लायसन्स घेतले आहेत. तैलचित्र लावणार आहेत, तैलचित्राचे जे अनावरण होणार आहे. ते माझे आजोबा सुद्धा विचार करत असतील काय हे गद्दार लोक माझ्या तैलचित्राचं अनावरण करतात. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षांमुळे महाराष्ट्र मागे चालले आहे, अशी जोरदार टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com