अपात्रतेच्या नोटीसीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया; कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल

अपात्रतेच्या नोटीसीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया; कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल

बंडखोर आमदारांवर अध्यक्ष कारवाई करत नसल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बंडखोर आमदारांवर अध्यक्ष कारवाई करत नसल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. यासाठी आमदारांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या नोटीसीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

अपात्रतेच्या नोटीसीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया; कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल
जगदंबेची शपथ घ्या! बावनकुळेंचे उध्दव ठाकरेंना आव्हान; असेल हिंमत तर एकदा...

विधानसभा अध्यक्ष यांनी शुक्रवारी काढलेली नोटीस आज मिळाली आहे. नोटीसचे उत्तर देण्यासाठी वेळ लागेल. यासाठी कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल. त्यासाठी आता अध्यक्षांकडे वाढीव मुदत मागणार आहोत. येत्या काळात कायदेशीर उत्तर लवकरच देऊ, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. काही लोकांना सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे ही नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे. पण तसे काही नाही.

तसेच, भाजप नामर्दांची पार्टी हे २५ वर्षानंतर कळाले का? एकत्र सत्ता भोगली, एकत्र जेवलो. त्यानंतर असे बोलणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.घरात बसले नसते तर आमदार नाराज झाले नसते. मग अडीच वर्षे तुम्ही घरात बसून काय केले, असा सवालही शिरसाटांनी विचारला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com