संजय शिरसाट यांचे 'त्या' ट्विटवरुन यु-टर्न; म्हणाले..
मुंबई : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे दिसत होते. अशातच संजय शिरसाटांनी ट्विटवर उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर, यात उध्दव ठाकरे यांचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख केला आहे. यामुळे शिरसाट परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात आहेत. परंतु, संजय शिरसाट यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत.
उध्दव ठाकरेंचा फोटो व व्हिडीओ ट्विट केल्याने संजय शिरसाट मंत्रिपदासाठी दबावतंत्र निर्माण करत असल्याचा आरोप केला जात होता. परंतु, कालचं ट्विट हे तांत्रिक अडचणींमुळे केलेलं ट्विट होते, अशी सारवासारव त्यांनी केले आहे. मी एकनाथ शिंदेंसोबतच राहणार असल्याचे शिरसाटांनी म्हंटले आहे. हे दबावतंत्र नाही. मी काही तरी करेल हे दाखवणं हे स्वभावात नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उध्दव ठाकरे यांचा कुटुंबप्रमुख म्हणत एक जुना व्हिडीओ ट्विट केला. परंतु, हा ट्विट केलेला व्हिडीओ काही क्षणातच शिरसाट यांनी डिलीट केला. यामुळे शिंदे गटातील संजय शिरसाट यांच्या ट्विटमुळे राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने दबावतंत्र निर्माण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.