Santosh Bangar : संतोष बांगर यांनी दिला विद्यार्थ्यांना अजब सल्ला म्हणाले...

हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानामुळे वादामुळे चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानामुळे वादामुळे चर्चेत असतात. आता तर त्यांनी थेट शालेय विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे.

संतोष बांगर म्हणाले की, पप्पा म्हणत असतील की दुसऱ्याला मतदान करायचं तर दोन दिवस जेवायचंच नाही आणि त्यांनी विचारलं का जेवत नाही तर त्यांना सांगायचं की आमदार बांगरला मतदान करा, नसता दोन दिवस जेवणार नाही. असं आमदार संतोष बांगर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या तोंडून वदवून घेतलं आहे. त्यामुळे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com