तिसरा डोळा उघडला तर भस्म करेल; संतोष बांगरांचा उध्दव ठाकरेंना इशारा

तिसरा डोळा उघडला तर भस्म करेल; संतोष बांगरांचा उध्दव ठाकरेंना इशारा

उध्दव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. याला संतोष बांगर यांनी कावड यात्रेतून उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

गजानन वाणी | हिंगोली : उध्दव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. याला संतोष बांगर यांनी कावड यात्रेतून उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. या कावड यात्रेत बांगर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे. तिसरा डोळा उघडला तर भस्म करेल, असा इशाराच संतोष बांगर यांनी ठाकरेंना दिला आहे.

तिसरा डोळा उघडला तर भस्म करेल; संतोष बांगरांचा उध्दव ठाकरेंना इशारा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते? मात्र...; शिंदे गटाच्या 'या' खासदाराने सांगितले...

संतोष बांगर म्हणाले की, उद्धव ठाकरे मला नाग म्हणाले. पण, हा नाग भोळ्या शंकराच्या गळ्यातला आहे. जर एकदा हा पलटला तर तुमचा तर असा सत्यानाश झाला. जर याचा तिसरा डोळा उघडला तर भस्म करेल.

माझं नाव संत्या आहे. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत संत्या आहे. आमच्या नादी लागायचं नाही. यांनी काल पाच जिल्ह्याची पब्लिक जमा केली होती. ही कालची येड्याची जत्रा होती. जे निष्ठावंताच्या गोष्टी करत आहेत त्यातील एक जिल्हाप्रमुख पाच पक्ष सोडून आला आहे. एक सीताफळ आणि दुसरा सहा बोट दाखवून त्यांनी दोन्ही जिल्हाप्रमुखांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

उध्दव ठाकरेंनी सभेतून संतोष बांगर यांच्यावर टीकास्त्र डागले होते. गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. पुंगी वाजवली, दूध पाजलं, मात्र तो शेवटी डसलाच, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com