Santosh Bangar
Santosh BangarTeam Lokshahi

शिवसेनेच्या फुटी दरम्यान ढसाढसा रडणारे आमदार संतोष बंगार यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ

विधानसभेत शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्यापुर्वीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहे. सरकार गेल्यानंतर आता पक्षही जाण्याच्या तयारीत आहे. पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. आता विधानसभेत शिंदे गट आणि भाजप सरकारची बहुमत चाचणी होण्यापुर्वीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

शिवसेना फुट पडली असतांना आमदार संतोष बांगर यांनी भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतांना त्यांना रडूही कोसळले होते. आता ते शिंदे गटात दाखल झाले आहे. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

Santosh Bangar
पवार म्हणतात, शिंदे सरकार दोन कारणांमुळे सहा महिन्यांत कोसळेल

केले होते वादग्रस्त वक्तव्य

ज्यांनी शिवसेनेसोबत बेइमानी केली त्यांच्यावर त्यांचा बायकासुद्धा विश्वास ठेवणार नाही. इतकेच काय तर त्यांची मुलं सुद्धा अविवाहित ( मुंजे) मरतील, असे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. त्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. संतोष बांगर मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांचा सत्कार करण्यात येत होता. त्या निमित्त वसमत शहरा शिवसैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. Maharashtra Politics : शिंदे भाजप सरकारची होणार आज खरी परीक्षा; सिद्ध करावं लागणार बहुमत

Santosh Bangar
Maharashtra Politics : शिंदे भाजप सरकारची होणार आज खरी परीक्षा; सिद्ध करावं लागणार बहुमत

रडू कोसळले होते..

उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर आमदार संतोष बांगर मतदार संघात परतले होते. त्यानंतर कट्टर शिवसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत झाले होते. बंड पुकारलेल्या आमदारांना यावेळी त्यांनी परत येण्याचं आवाहन केलं. हात जोडून त्यांनी आमदारांना परत या असं आवाहन केलं. यावेळी त्यांचे डोळेही पाणावले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com