हिवाळी अधिवेशनाला यंदा चिमुकल्या पाहुण्याची हजेरी; सरोज अहिरे बाळासोबत सभागृहात दाखल

हिवाळी अधिवेशनाला यंदा चिमुकल्या पाहुण्याची हजेरी; सरोज अहिरे बाळासोबत सभागृहात दाखल

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन थेट हिवाळी अधिवेशनात दाखल झाल्या आहेत.

नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक नेते येतात, चर्चा करतात. मात्र, यंदा एका चिमुकल्या पाहुण्याने हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली आहे. या चिमुकल्या बाळाची आता चर्चा होत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे बाळ कुणाचं? आमदार सरोज अहिरे या आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधानभवनात आल्या आहेत.

हिवाळी अधिवेशनाला यंदा चिमुकल्या पाहुण्याची हजेरी; सरोज अहिरे बाळासोबत सभागृहात दाखल
बेळगावातील मराठी नेत्यांच्या धरपकडीवरून अजित पवार संतप्त; म्हणाले, हुकूमशाही...

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन थेट हिवाळी अधिवेशनात दाखल झाल्या आहेत. त्या म्हणाल्या की, मतदार संघातील प्रश्न सुटावे यासाठी महत्त्वाच्या अधिवेशनाला मी मुकणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे. लोकांच्या समस्या या अधिवेशनात सुटल्या पाहिजेत यासाठी मी माझ्या बाळाला घेऊन विधानसभा सभागृहात पोहचली आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघासात निवडणूक लढवण्याची तयारी सरोज आहिर यांनी केली होती, त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत, देवळाली मतदारसंघात विजय मिळवला होता.

हिवाळी अधिवेशनाला यंदा चिमुकल्या पाहुण्याची हजेरी; सरोज अहिरे बाळासोबत सभागृहात दाखल
'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ शेअर केला? संजय राऊत म्हणाले...

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारची सभागृहात कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com