Satya Pal Malik : 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो 

Satya Pal Malik : 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो 

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली
Published by  :
Siddhi Naringrekar

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक रणनीतीवर दावा केला की 2024 मध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान काहीही करू शकतात.

पुलवामा हल्ल्याचे उदाहरण देताना मलिक म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनेत सक्षम कोणीही राजकीय उद्दिष्टसाध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो. असे वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून चर्चा रंगल्या आहेत.

सत्तेसाठी हे लोक #राम_मंदिर हल्ला करू शकतात किंवा #BJP मोठ्या नेत्याची हत्या ही करू शकतात. जे #पुलवामा हल्ला करू शकतात ते काहीही करू शकतात : सत्यपाल मलिक असे म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com