तू मूर्तिमंत उदाहरण...; सत्यजीत तांबेंच्या आदित्य ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा

तू मूर्तिमंत उदाहरण...; सत्यजीत तांबेंच्या आदित्य ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा

सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

चेतन ननावरे | मुंबई : दोघेही तरुण, दोघांनाही राजकीय वारसा लाभलेला... पण संघर्ष दोघांनाही चुकला नाही! आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार आदित्य ठाकरे या दोन युवा नेत्यांमधील हे साम्य! तांबे वयाने आणि अनुभवानेही आदित्य ठाकरे यांच्यासाठी थोरलेच. या थोरलेपणाच्या नात्यानेच सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांसोबत आ. सत्यजीत तांबे यांचे संबंध मैत्रीचेच आहेत. त्यात युवा नेत्यांसोबत त्यांचे विचार आणखीनच चांगले जुळतात. सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना तांबे यांनी आदित्य यांचा उल्लेख 'प्रिय आदित्य' असा केला. 'जेव्हा परिस्थिती आव्हानात्मक होते, तेव्हा आव्हानं पेलणाऱ्यांचं काम सुरू होतं,' या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण तू आहेस, अशी दिलखुलास स्तुती करत सत्यजीत तांबे यांनी आपल्या सदिच्छा आदित्य यांना दिल्या.

सध्याच्या गढुळलेल्या राजकीय वातावरणात एका युवा नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या युवा नेत्याच्या कामाची कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या, या बाबीचं कौतुक राजकीय वर्तुळातच नाही, तर सोशल मीडियावरही होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com