Satyajeet Tambe | Devendra Fadnavis
Satyajeet Tambe | Devendra FadnavisTeam Lokshahi

सत्यजित तांबेंनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट; भेटीचे कारणही केले स्पष्ट

जुनी पेन्शन, जलसंपदा विभागातील जागा भरती,सरकारी नोकर भरती, येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा याबाबत त्यांनी फडणवीसांची चर्चा केली.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर विधानपरिषदेच्या जागेवरून आमदार झालेले सत्यजित तांबे यांचा विधिमंडळात प्रवेश झाला आहे. त्यातच कालपासून राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाला आमदार तांबे यांनी देखील हजेरी लावली आहे. परंतु, या वेळी आज अधिवे०शनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. परंतु, या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Satyajeet Tambe | Devendra Fadnavis
शशिकांत वारिसे हत्येचा मास्टरमाईंड शोधा, पोलिसांना ‘फ्री हॅण्ड’ दया; अजित पवार सभागृहात आक्रमक

या कारणामुळे सत्यजित तांबेंनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट?

सत्यजित तांबेंनी या भेटीबाबत ट्विटरवर फोटो टाकले आहेत. त्यात ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. माझे आजोबा स्व.स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांचे आत्मचरित्र त्यांना भेट म्हणून दिले. त्याचबरोबर जुनी पेन्शन, जलसंपदा विभागातील जागा भरती,सरकारी नोकर भरती, येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा केली. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com