83 वर्षाचा योद्धा मार्गदर्शन करणार, लवकर या, सुरक्षितपणे या; लेकीची कार्यकर्त्यांना साद
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज अजित पवार आणि शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी 83 वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. पुढची रणनीती ठरवून पक्षाला दिशा देणार आहेत. त्यामुळे या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या. लवकर या आणि सुरक्षितपणे या. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने शरद पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.