पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा साजरा करणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसांच्या औचित्या साधत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. गणेशोत्सवामुळे तब्बल दोन आठवडे मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नव्हती. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. पंतप्रधान मोदी यांचा आग्रह असतो की माझा वाढदिवस साजरा करू नका, जनतेची सेवा करा, म्हणूनच हा निर्णय घेतला आहे. 17 तारखेपासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या 15 दिवसांमध्ये जनतेची सेवा करणार आहोत. या कालावधीत जनतेची प्रलंबित कामे निकाली काढणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.