माकडाच्या हातात कोलीत; राऊतांच्या 'त्या' विधानावर शहाजी बापू पाटलांचा पलटवार

माकडाच्या हातात कोलीत; राऊतांच्या 'त्या' विधानावर शहाजी बापू पाटलांचा पलटवार

संजय राऊतांच्या टीकेचा शहाजी बापू पाटलांनी घेतला समाचार

पंढरपूर : मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यांच्यावर लवकरच महाराष्ट्र डायरी ऑफ खोका हा चित्रपट काढणार असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली होती. यावरुन शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. राऊतांच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी माकडाच्या हातात कोलीत असा चित्रपट काढणार असल्याचं शहाजी बापूंनी म्हंटले आहे.

माकडाच्या हातात कोलीत; राऊतांच्या 'त्या' विधानावर शहाजी बापू पाटलांचा पलटवार
धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य : नाना पटोले

मुळात संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसले आहेत. आता संजय राऊत नेमक्या कोणत्या पक्षातून बोलत आहेत त्यांना समजतं नाही. संजय राऊत बिनबुडाचा गाडगं आहे. कुठे पण गरगळत आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी संजय राऊतांवर केली आहे. हे खोकं खोकं म्हणून संजय राऊत दगड हाणत फिरलं. आम्ही पण एक चित्रपट काढणार आहे माकडाच्या हातात कोलीत संजय राऊत असा चित्रपट काढणार आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, आम्हाला किती जागा मिळणार यावर संजय राऊत यांनी बोलू नये. संजय राऊत ठाकरे गटाचा बुद्धिभेद करण्याचं काम करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. मी शिंदे-मिंधे यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहतच नाही. मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात पाळलेले. ते कधीही कोंबड्या कापल्या जातात. सकाळ संध्याकाळ कोंबड्या आरवतच असतात. तसे ते करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? असे संजय राऊत म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com