सांगोल्यात काय झाडी, काय डोंगर हिट! शिंदे गटाचे दोन सरपंच बिनविरोध

सांगोल्यात काय झाडी, काय डोंगर हिट! शिंदे गटाचे दोन सरपंच बिनविरोध

विधानसभेची लिटमस चाचणी म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली आहे.

अभिराज उबाले | पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सांगोल्यातील चिणके, पाचेगाव आणि बलवडी या तीन ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच वर्चस्व मिळवले आहे. चिणके व पाचेगाव या दोन ग्रामपंचायतीचे सरपंच तर बलवडी ग्रामपंचायतीचे 8 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील‌ आणि दिपक साळुंखे गटाने या तिन्ही ग्रामपंचायतीवर प्रथमच झेंडा फडकावला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधी शेकापला मोठा धक्का दिला.

सांगोल्यात काय झाडी, काय डोंगर हिट! शिंदे गटाचे दोन सरपंच बिनविरोध
गुजरात निकाल अपेक्षित, महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योग...; उध्दव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चिकणे ग्रामपंचायीच्या सरपंचपदी आमदार पाटील व दीपक साळुंखे गटाचे नाथा खंडागळे तर पाचेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगिता भोसले या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर बलवडी ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 8 सदस्य आमदार पाटील गटाचे बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण सहापैकी तीन ग्रामपंचायतीवर आमदार पाटील गटाने वर्चस्व मिळवले.

तर उर्वरीत चिंचोली, अनकढाळ आणि शिवणे या तीन ग्रामपंचातीमध्ये आमदार पाटील गट आणि शेकापमध्ये सरळ लढत होत आहे. सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांची युती आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार युवा सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विधानसभेची लिटमस चाचणी म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पाटील गटाने बाजी मारली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com